TG Telegram Group & Channel
True Thoughts😊 | United States America (US)
Create: Update:

#मायलेक
१५ वर्षांपूर्वी मी प्रेग्नन्ट असताना बरेच महिने
मला बेडरेस्ट सांगितली होती. त्याच सुमारास माझी आजी ( आईची आई ) कॅन्सरमुळे खूपच आजारी होती.साधारणपणे सगळ्या पहिलटकरणींप्रमाणेच मलाही आई जवळ असावी असंच वाटायचं.ती जवळ असली की एक निश्चितता असायची.आई माझ्याजवळ असली की तिचं मन आजीकडे धाव घ्यायचं,तर आजीपाशी असली की माझ्याजवळ.खूप धावपळ होत होती तिची.एकीकडे तिला जिने जन्म दिला ती अशी आजारी तर दुसरीकडे तिने जिला जन्म दिला ती नवीन जीवाला जन्म देणार होती.
एकीकडे माझे दिवस भरत आले , तसतशी माझ्या आजीची तब्बेत खूपच खालावली होती. आजी एवढी आजारी होती तरीही तिला तिच्या मुलीची जास्त काळजी होती.तिची होणारी धावपळ तिला बघवत नव्हती.शेवटी काही झालं तरीही आईचं हृदय होतं ते. मला नववा महिना लागताच आजी देवाघरी गेली.१५ दिवसातच माझी डिलिव्हरी झाली.स्वतःची आई गेल्याचं दुःख विसरुन माझी आई माझ्या आनंदात सामील झाली.लेकीच्या प्रेमापेक्षा आईच्या प्रेमाचं पारडं जास्त जड होतं.
हे आठवायचं कारण म्हणजे बरोबर १ वर्षांपूर्वी माझ्या आईचं दोन्ही गुढग्यांचं ऑपरेशन झालं.तेव्हासुद्धा तारीख ठरवताना माझ्या लेकाची परीक्षा वगैरे बघून तिने तारीख ठरवली.मी आईकडे गेले तेव्हा स्वयंपाकघरातली तिची पूर्वतयारीच एवढी होती की जेणेकरुन मी स्वयंपाक करीन तेव्हा मला जास्त त्रास होऊ नये. स्वतःला एवढा त्रास होत असताना देखील लेकीची काळजी .
माझा लेकही प्रथमच एवढे दिवस मला सोडून राहिला होता.ती सुट्टीला एकटा आजीआजोबांकडे राहायचा ते वेगळं पण सगळं रुटीन सुरु असताना मी बरेच दिवस घरी नाही असं प्रथमच झालं होतं.काही दिवस गेल्यावर माझा लेक सतत बाबाला ," कसं तरीच होतंय " म्हणत होता. या कसंतरी चं औषध ' आई ' होतं खरंतर. त्यामुळे माझंही मन लेकाकडे धाव घेऊ लागलं होतं.एकीकडे आईची काळजीही होती.१५ दिवसातच माझी आई ," तू जा बिनधास्त .काही काळजी करु नको म्हणू लागली " .मी सुद्धा तिचं थोडंफार रुटीन लागल्यावर लेकाच्या ओढीने परत आले. परत एकदा आईच्या प्रेमाचं पारडं जड ठरलं होतं .
आईच्या डोळ्यात पाणी बघून म्हणावसं वाटलं ,
" डोळ्यात तुझ्या पाणी का गं आई ??
आठवली का गं तुला तुझी आई ??
ये माझ्या मांडीवर डोके ठेव जराशी
होऊदेत मला तुझी आई थोडीशी "
सायली वझे पानसे

>>Click here to continue<<

True Thoughts😊

Share with your best friend
VIEW MORE

United States America Popular Telegram Group (US)