अहो तुम्ही एवढ्या सुंदर आयुष्यातल्या जागा सापडून दिल्या खरंच आजचा प्रवास मनात नवीन जागा निर्माण करणारा ठरला,..आणि हे शिकवणारही की माणसाला जागा घरात,प्रवासात किंवा मनात कुठेही मिळाली तरी ती माणसं जोडणारीच असते,..मावशी म्हणाली,"अगदी खरं बोललात,..तेवढ्यात स्टॉप आला आणि मावशी उतरली,..अनुने हाताने ती दिसेनाशी होई पर्यंत तिला टाटा केला,..तिला जाणवलं मावशी बोलल्या ते अगदी खरं होतं,.. आपली आर्थिक परिस्थिती छान होती त्यामुळे आईने कधी कोणाला जवळ फिरकू दिलं नाही,..पोरांना तर नुसतं वाऱ्यावर सोडलं होतं ती गुंग होती तिच्याच भौतिक सुखात आणि आता कोणी तिला बोलवत नाही तेच वसु मावशी गरिबी असुनही ही माणसांची श्रीमंती तिने कमवून ठेवली कारण तिने तेंव्हा घरात जागा नसली तरी मनात जागा दिली होती प्रत्येकाला,..अनुच्या मनात आलं आता आपला आयुष्याचा पुढचा प्रवास वसु मावशी होण्याचाच कारण एकवेळ जगात राहायला जागा सहज मिळते पण माणसाच्या मनात ती मिळवावीच लागते,..😊
वाचकहो कथा कशी वाटली नक्की कळवा,...तुमच्या शुभेच्छांमुळे मी 'नाईट आऊट' नावाचा कथासंग्रह प्रसिद्ध केला आहे,..प्रत हवी असल्यास मेसेंजरवर सम्पर्क करा,..असेच ब्लॉग्स वाचण्यासाठी swapna ब्लॉग्स ह्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.धन्यवाद....
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद
कथाविश्व - आपले कथांचे पान🎉
>>Click here to continue<<