साधारणतः मी बारावीला असताना आमच्या कॉलेजच्या मराठी विभागाच्या एका प्राध्यापक महोदयांचा कथासंग्रह प्रकाशित झाला. त्याचं नाव होतं “बाकी उरते शून्य” खरतर त्या वयात त्या संग्रहातील कथा कळणं जरा जडच होतं पण तरीही वाचण्याची चेष्टा करणार नाही ते मन कसलं? एकंदरीत काय तर त्यातील कथा तर आठवत नाहीत पण त्या संग्रहाच्या शीर्षकाने मात्र मनात घर केल ते अगदी पक्कच… ते शीर्षक आजही डोक्यातून जात नाहीये.. मुळात ते मिटवायचं नाहीच आहे.. कारण सत्य मिटवता येतच नाही.. बाकी कुणी कितीही पुढे गेला आणि कुणी कितीही मागे राहिला तरीही आयुष्य अस काही भाग देते की कधीतरी ओठांवर शब्द हे येतातच “बाकी उरते शून्य”…
~निरंजन
#जगणं
>>Click here to continue<<