2003-04 चा भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा.... सेहवाग, द्रविड, लक्ष्मण, गांगुली सर्वांच्या धावा येत होत्या... सचिन मात्र Cover Drive मारताना Out व्हायचा.... शेवटी सिडनी वर खेळत असलेल्या शेवटच्या कसोटीत त्याने एकही Cover Drive चा फटका न मारता 50-100-150 नाही तर तब्बल 241 धावा बनवल्या होत्या, जी त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
आता या गोष्टीतून काय घ्यायचे आहे ते तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे आजपर्यंत जेवढ्या वेळेस cover drive खेळताना कितीही वेळा आउट झाला असाल तर विसरून जा. उद्या खेळपट्टीवर टिकून रहा. सचिन ला cover drive खेळता येत नव्हता अश्यातला भाग नाही. बाकी तुम्हाला उद्या काय करायचा आहे हे तुम्ही माझ्यापेक्षा जास्त ओळखता 😊.
सांगायचा मुद्दा तोच... आधी जेवढ्या चुका केल्यात त्या टाळा... बस्स 😊.
एक तासाचे गणित कोलमडून देऊ नका. ( उद्या काहीही सत्याचे प्रयोग करू नका) जे तुम्हाला comfortable आहे, Test series मधे किंवा practice मधे अंदाज घेऊन जे ठरवलं असेल ते करा. उगाच कोणीतरी सांगितला म्हणून काहीतरी वेगळं करायला जाऊ नका.
सर्वाना सर्वकाळ शुभेच्छा 😊✌️
@MissionCombined
>>Click here to continue<<