TG Telegram Group Link
Channel: K'Sagar Publications
Back to Bottom
.                   🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदी आणि  ग्रामपंचायतीने संमत केलेले ठराव यांची अंमलबजावणी करण्याचे अधिकार.... यांना असतात.
- सरपंच

🔹२) प्रत्येक जिल्ह्यातील नागरिकांच्या मागासवर्गाच्या प्रवर्गा साठी ठेवावयाची सरपंचांची पदे शक्यतो त्या जिल्ह्यातील सरपंचांच्या एकूण पदसंख्येच्या .... असतात.
- सत्तावीस टक्के

🔸३) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमांतील नवीन सुधारणां
नुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग आणि स्त्रिया यांसाठी राखून ठेवावयाच्या सरपंचाच्या पदांची संख्या निश्चित करण्याचे अधिकार कोणास आहेत ?
- राज्य शासन

🔹४) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ५७ अन्वये प्रत्येक खेड्यासाठी 'व्हिलेज फंडा' ची तरतूद आहे. हा फंड सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी .... वर असते.
- ग्रामपंचायत सचिव

🔸५) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ६० अन्वये प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी अथवा ग्रामपंचायतींच्या गटां साठी एक किंवा अधिक ग्रामपंचायत सचिव असतात. ग्रामपंचायत सचिवांची संख्या निश्चित करण्याचे अधिकार कोणास आहेत ?
- मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.


लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
8881.pdf
208.2 KB
♦️👉जा.क्र.011/2020 विमा सहायक संचालक, सामान्य राज्यसेवा, गट अ संवर्गाकरीता दिनांक 9 मे 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
8882.pdf
224.4 KB
♦️👉जा.क्र.011/2020 विमा सहायक संचालक, सामान्य राज्यसेवा, गट अ संवर्गाकरीता दिनांक 9 मे 2024 रोजी आयोजित अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
.                    🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) उपसरपंचांची सरपंच म्हणून निवड झाल्यास.....
- उपसरपंचांचे पद रिक्त होईल.

🔹२) प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्त्री- प्रतिनिधींसाठी..... जागा राखीव असतात.
- एक-द्वितीयांश

🔸३) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावयाचा असल्यास त्यांनी तो .... कडे सादर करावा लागतो.
- सरपंच

🔹४) संबंधित खेड्यातील अनुसूचित जाति-जमातींची लोक संख्या लक्षात घेऊन ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाति जमातींच्या प्रतिनिधींसाठी राखीव जागांची संख्या निर्धारित करण्याचे अधिकार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १० (२) (अ) अनुसार .... यांना आहेत.
- राज्य निर्वाचन आयोग

🔸५) आपली कर्तव्ये करताना केलेली गैरवर्तणूक, कर्तव्ये पार पाडताना दाखविलेला निष्काळजीपणा वा असमर्थता कारणांवरून सरपंच, उपसरपंच वा ग्रामपंचायत सदस्य यांना पदावरून दूर करता येते. महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम कलम ३९ अन्वये हे अधिकार आहेत ....
- जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीला

लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)
भारताच्या.... या राष्ट्रपतींनी सर्वाधिक काळ राष्ट्रपतिपद भूषविले.
Anonymous Quiz
10%
डॉ. एस. राधाकृष्णन
72%
डॉ. राजेंद्रप्रसाद
14%
डॉ. झाकीर हुसेन
4%
के. आर. नारायणन
२४ जानेवारी, १९६६ रोजी इंदिरा गांधी पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधान झाल्या तेव्हा त्या .....
Anonymous Quiz
10%
लोकसभेच्या सदस्या होत्या.
39%
राज्यसभेच्या सदस्या होत्या.
37%
राष्ट्रपतिनियुक्त लोकसभा सदस्या होत्या.
13%
कोणत्याही गृहाच्या सदस्या नव्हत्या.
नागरी सेवा परीक्षा पद्धतीचे गुणांकन व तीमधील सुधारणा यांच्याशी संबंधित समिती खालीलपैकी कोणती ?
Anonymous Quiz
20%
पी. सी. जैन समिती
30%
धर्मवीर समिती
44%
वाय. के. आलघ समिती
6%
पॉल अॅपलबी समिती
🔰अफगाणिस्तानला जागतिक बँकेकडून USD 84 दशलक्ष मानवतावादी मदत मिळाली

🔹अफगाणिस्तानला जागतिक बँकेकडून आर्थिक स्थैर्य, महिला समर्थन, हवामान बदल या संकटाच्या वेळी मानवतावादी मदतीसाठी $84 दशलक्ष मिळाले.

🔸उपजीविका प्रकल्प, असुरक्षित गट, स्थलांतरित पुनर्एकीकरण, ग्रामीण आणि शहरी समुदाय सेवा आणि संस्थांना मदत करण्यासाठी निधी.

🔹त्याची सुरुवात 2022 मध्ये अफगाणिस्तान रिकन्स्ट्रक्शन ट्रस्ट फंड (ARTF) कडून प्रारंभिक $265 दशलक्ष अनुदानाने झाली.
🔰झिम्बाब्वेने आपले नवीन चलन जारी केले

🔹"झिम्बाब्वे गोल्ड" किंवा "ZiG" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवीन चलनाचे सर्वोच्च मूल्य 200 ZiG नोट असेल, ज्याचे मूल्य अंदाजे $15 आहे.

🔸व्यक्तींना दर आठवड्याला ZiG 3,000 पर्यंत पैसे काढण्याची परवानगी असेल, तर कंपन्या ZiG 30,000 पर्यंत काढू शकतात.

🔹देशात वाढत्या चलनवाढीचा सामना होत असताना नवीन चलन आणण्याचे हे पाऊल पुढे आले आहे.

🔸झिम्बावे राजधानी: हरारे.
कोणत्या राज्याने MSME (स्थापना आणि ऑपरेशनची सुविधा) नियम, 2023 मंजूर केले?
Anonymous Quiz
28%
आसाम
40%
तामिळनाडू
28%
ओडिशा
4%
पश्चिम बंगाल
झांझिबार, जिथे पहिले IIT ग्लोबल कॅम्पस उभारले जाणार आहे, ते कोणत्या देशात आहे?
Anonymous Quiz
4%
इजिप्त
71%
टांझानिया
21%
केनिया
4%
दक्षिण आफ्रिका
HTML Embed Code:
2024/05/03 02:42:28
Back to Top