TG Telegram Group & Channel
Current affairs by sakhare sir📘📝 | United States America (US)
Create: Update:

🎯🎯भारतात परतल्यावर त्यांना सीनियर डॉक्टर म्हणून 'लेडी डफरिन हॉस्पिटल'ने त्यांना स्वीकारले. त्यांनी प्रायव्हेट प्रॅक्टिसही सुरू केली. या उच्चशिक्षित, नीडर डॉक्टरने रुग्णसेवेसाठी गावोगावी दौरे सुरू केले. रात्री बेरात्री घोडागाडीतून रोगी तपासायला त्या जात. त्यांना यश, प्रसिद्धी, पैसा मिळू लागला. त्या दरम्यान एका पुरुष डॉक्टरने एका स्त्रीच्या पोटात ट्युमर असल्याचे निदान केले. मात्र, कादंबिनींनी तिची संपूर्ण तपासणी करून ती गरोदर असल्याचे सांगितले आणि यथावकाश तिची सुरक्षित प्रसूतीही केली. या घटनेने त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले.

🎯 १८९५ मध्ये त्यांनी नेपाळच्या राणीची वैद्‍यकीय अधिकारी ही जबाबदारी स्वीकारली आणि नेपाळच्या रॉयल फॅमिलीच्या डॉक्टर म्हणूनही त्या ओळखल्या जाऊ लागल्या.

🎯डॉक्टरकीबरोबर कादंबिनीदेवींनी सामाजिक, राजकीय कार्यात भाग घेतला. १८८९ मध्ये त्यांना 'इंडियन नॅशनल काँग्रेस'मध्ये प्रवेश देण्यात आला. १८९० मध्ये कलकत्ता काँग्रेस अधिवेशनात त्यांनी भाषण केले.

🎯*१८९५ मध्ये त्यांनी काँग्रेस अधिवेशनात बंगालचे प्रतिनिधित्व केले. १९०६ मध्ये त्यांनी 'वुमन्स कॉन्फरन्स इन कलकत्ता'ची स्थापना केली*

🎯आठ मुलांची आई असलेल्या कादंबिनीदेवींनी संसाराकडेही व्यवस्थित लक्ष दिले. व्यग्र वैद्‍यकीय चिकित्सक अशा त्‍यांच्‍या व्यक्तिमत्वात स्नेहशील, हौशी, प्रेमळ मनही होते. सुंदर आणि एकसारखी लेस विणण्यात त्या तरबेज होत्या. ज्या काळी महिला डॉक्टर परीकथा वाटत होती, त्या काळी कादंबिनींनी वैद्यकीय सेवा दिलीच; शिवाय आठ मुलांना वाढवून सामाजिक-राजकीय कार्यही केले.

🎯डॉ. कादंबिनीदेवींबद्दल अमेरिकन इतिहासतज्ज्ञ डेव्हिड कोप्फ लिहितात, 'त्या काळातील सर्वांत सफल, श्रेष्ठ व स्वतंत्र ब्राह्मो स्त्री म्हणजे कादंबिनीदेवी. तत्कालीन स्त्रीची स्थिती पाहता, अनेक अडथळे पार करत स्वत:ला सिद्ध करण्याची त्यांची क्षमता ही प्रेरणेचा मूलस्त्रोतच म्हणावी लागेल.' त्‍यांची नात पुण्यलता लिहिते, 'आजी खूप प्रेमळ होती. तिच्या अभ्यासिकेला आम्ही मुले 'कंकालघर' म्हणायचो; कारण भिंतीवर एक मानवी सांगाडा सतत झुलत असे. कपाटात ग्रंथ, यंत्र, उपकरणं आणि कुठले कुठले नमुने ठेवलेल्या बाटल्या असत. ती जिथे असेल तिथे हास्य, गप्पागोष्टी यांनी वातावरण भारून जात असे. या प्रेमळ आजीचे नियमही फार कडक होते. घरातील कोणीही रात्री नऊनंतर घरी आले, तर त्याला जेवण मिळत नसे...!'

🎯पंधरा वर्षांचे सहजीवन द्वारकानाथ आणि कादंबिनीदेवींना लाभले. द्वारकानाथांचा मृत्यू झाला, त्या दिवशी दुपारी कादंबिनीदेवींना एका बाळंतपणासाठी कॉल आला होता. त्याही स्थितीत आपली बॅग घेऊन त्या निघाल्या आणि क्रोधित नातेवाइकांना म्हणाल्या, 'जे गेले ते परत येणार नाहीत; पण जो नवा जीव येतोय, त्याला आणायला मला जायलाच हवे.!' कादंबिनीदेवींना उच्च रक्तदाबाचा त्रास होता; पण त्याचा त्यांनी डॉक्टरी कामांवर परिणाम होऊ दिला नाही.

🎯 ३ ऑक्टोबर १९२३ रोजी सकाळी डॉ. कादंबिनींनी एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. त्याच दिवशी संध्याकाळी अतिश्रमाने त्‍यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्‍यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

🎯संकलन :शिवानंद साखरे सर, पुणे

🎯दररोजच्या मोफत चालू घडामोडी नोट्स साठी जॉईन करा Telgram चॅनल 👇👇

https://hottg.com/currentshiva

>>Click here to continue<<

Current affairs by sakhare sir📘📝

Share with your best friend
VIEW MORE

United States America Popular Telegram Group (US)