महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
EWS मधील SEBC उमेदवारांना पूर्व परीक्षा होण्याच्या आधीच SEBC विकल्प निवडण्याची संधी द्यावी लागेल.
नाहीतर पूर्व परीक्षा झाल्यानंतर खूप किचकट कायदेशीर पेच निर्माण होतील.
पूर्व परीक्षा झाल्यानंतर विकल्प निवडण्याची संधी खालील समस्या निर्माण करील.
मूळ EWS मधील उमेदवार SEBC उमेदवारांना बाहेर काढा म्हणतील / आयोग तशी संधी देईल पण त्याच वेळी आता SEBC प्रवर्गात अर्ज भरलेले उमेदवार पूर्व परीक्षा होण्याच्या आधी आणि आता आरक्षण स्थिती सारखीच असताना आयोग ही बदलायची संधी कशी देऊ शकतो? या आधारे या उमेदवारांनी चुकीची माहिती भरून अर्ज भरले असाही युक्तिवाद करता येईल. ज्या EWS मधील वयाधिक झालेल्या उमेदवारांनी SEBC विकल्प निवडला नाही त्यांच्याविषयी काय? नियमानुसार ते पूर्व परीक्षा देण्यासच पात्र नाहीत उद्या हाही मुद्दा हरकतीचा असेल.
उद्या EWS मधील SEBC उमेदवारांना चॅलेंज करणारे पूर्व परीक्षा झाल्यावर समोर येतील ज्यांची कायदेशीर बाजू मजबूत असेल त्यावर उपाय काय?
यावर सर्वांच्या हिताच्या दृष्टीने एकच उपाय आहे पूर्व परीक्षा होण्याच्या आधीच EWS मधील उमेदवारांना SEBC विकल्प निवडण्याची संधी देऊन परीक्षा आयोजीत करणे.
>>Click here to continue<<