🔖 🌞......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....🌞🔖
◾️ स्वीडन हा NATO संघटनेचा 32 वा सदस्य बनला आहे
◾️ इंडियन ऑइल कॉर्पोरेशन फॉर्म्युला 1 इंधन स्टॉर्म' पेट्रोलचे उत्पादन करणारी पहिली भारतीय कंपनी बनली आहे
◾️आजारांशी लढण्यासाठी केलेल्या अनुकरणीय प्रयत्नांसाठी भारताला प्रतिष्ठित गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
◾️AI इनोव्हेशनला चालना देण्यासाठी आणि भारताला AI नवकल्पनांमध्ये आघाडीवर ठेवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय स्तरावरील इंडिया आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मिशनसाठी 10,371.92 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे.
◾️रांचीच्या माजी महापौर आणि भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव डॉ. आशा लाक्रा यांची भारत सरकारने राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या (NCST) सदस्यपदी नियुक्ती केली आहे.
◾️ आशा लाक्रा यांचे पद हे केंद्रातील केंद्रीय राज्यमंत्रिपदाच्या बरोबरीचे आहे.
◾️पर्यटनाला चालना देण्यासाठी परदेशी भारतीयांना सहभागी करून घेण्यासाठी मोहीम सुरू करणार आहेत .चलो इंडिया ग्लोबल डायस्पोरा मोहीम एकाच वेळी परदेशातील सर्व भारतीय दूतावास आणि उच्च आयोगांमध्ये सुरू केली जाईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली
◾️नुकतेच इंडोनेशिया देशाने भरतासोबत "भारतीय रुपया" या चलनामध्ये व्यापार करण्यास मान्यता दिली आहे
◾️पेनांग, मलेशिया येथे आयोजित 45 व्या IAA जागतिक काँग्रेसमध्ये, श्रीनिवासन स्वामी यांना IAA गोल्डन कंपास पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त करणारे स्वामी हे एकमेव भारतीय उद्योग नेते होते.
◾️T20 विश्वचषक 2024 वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेट्स संयुक्तपणे आयोजित करेल ! युनायटेड स्टेट्स प्रथमच आयसीसी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करत आहे
◾️प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे आणि कोल्हापूर विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन दूरदृश्यप्रणालीद्वारे आझमगड(उत्तर प्रदेश) येथून करण्यात आले.
➗➗➗➗➗➗➗➗➗
>>Click here to continue<<