विजयी सदा राम राजाधिराज
रामा रमेशा मना माझ्या भज
भितो निशाचर असुरसमाज
ज्याला त्या रामाचे मी पदरज
थोर रामाहुनी नसे कोणी रामाचाची दास मी
जडो चित्त तुझ्या ठायी रामा उद्धार माझा करी
उमे सुमुखे ऐक महाजप मम हा राम राम
विष्णू सहस्त्र नामासम महामंत्र रामनाम
असे हे बुधकौशिक विरचित श्रीरामरक्षा स्तोत्र समाप्त
रामकृपेने नारायणाने जे केले मराठीत अनुवादित
श्री रामचंद्रार्पणमस्तु !
🙏🏻🕉️🙏🏻
ज्ञानेन पूंसां सकलार्थसिद्धिर्ज्ञानादृते काचन नार्थसिद्धिः।
ज्ञानस्य मत्वेति गुणान्कदाचिज्ज्ञानं न मुञ्चन्ति महानुभावाः।।
ज्ञानाने माणसांना सर्व पुरुषार्थ साधता येतात. ज्ञानाशिवाय काहीच साध्य होत नाही. असे ज्ञानाचे गुण जाणून थोर लोक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न कधीही सोडत नाहीत .
🙏🏻🕉️🙏🏻
आनंदयोगी
>>Click here to continue<<